Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 24 : सातारा जिल्हा पोलीस दलातील मुख्यालयांतर्गत असणार्‍या पोलीस कॅन्टीनमधील हवालदार गणेश विश्‍वनाथ गुरव (वय 36, रा.वडूथ, आरळे, ता.सातारा) यांचा शुक्रवारी कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला.  
सकाळी नेहमीप्रमाणे 9 च्या सुमारास कॅन्टीनमध्ये आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पोलीस सहकार्‍यांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असताना साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. लष्करामध्ये सेवा बजावल्यानंतर ते पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 3 मुली, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहेे. दरम्यान, या घटनेने पोलीस दलावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: