Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अकलूजच्या गिर्यारोहकाचा एव्हरेस्ट सर केल्यानंतर मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: re1
5सोलापूर, दि. 24 (प्रतिनिधी) : गुरुवारी एव्हरेस्ट सर करणारा अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान याचा त्याच दिवशी एव्हरेस्ट कॅम्प-4 (26000 फूट) वर अती थकव्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती नेपाळ येथील कंपनी ‘पिक प्रमोशन प्रा. लि;’ यांनी दिली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला निहाल याच कंपनीबरोबर एव्हरेस्ट चढाई मोहिमेवर गेला होता.
23 मे रोजी सकाळी 8.30 वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर निहाल व त्याच्या शेर्पाने खाली उतरण्यास सुरुवात केली. एकाच दिवशी जगभरातील 200 पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करत असल्यामुळे अनेक वेळा जाम होऊन प्रत्येक गिर्यारोहकाला खूप वेळ थांबावे लागत होते. अशातच अतिशय थकव्यामुळे कॅम्प-4 येथे पोहचून निहाल बागवान याने शेवटचा श्‍वास घेतला, अशी माहिती केशव पुडिया यांनी दिली.
मुंबई येथील
अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू
दरम्यान, दि. 22 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या अंजली कुलकर्णी (वय 54) यांचाही एव्हरेस्ट बाल्कनी जवळ मृत्यू झाला. 
महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रासाठी ही अतिशय दुःखद बाब ठरली आहे.  भारत सरकारकडून मृतदेह खाली आणण्यासाठी प्रयत्न
 भारत सरकारकडून निहाल बागवान याचा मृतदेह एव्हरेस्ट कॅम्प 4 पासून खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच याबद्दल एक मोहीम आखली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: