Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: lo1
दोन लाख 45 हजार रुपयांची रोकड हस्तगत
5सातारा, दि. 22 :  वाढे फाटा, सातारा येथे मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 2 लाख 45 हजार रोख रकमेसह 9 मोबाईल, 3 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 21 रोजी मध्यरात्री 2.39 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी वाढे फाटा येथील बाबर चिकन सेंटरच्या पाठीमागे असणार्‍या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता श्रीकांत लक्ष्मण पाटील (वय 59), रा. पाटखळ, ता. सातारा, सुनील अनिल कुंभार (वय 24), रा. संगमनगर, ता. सातारा, बाळकृष्ण दिनकर कणसे (वय 52), रा. कोडोली, ता. सातारा, अशोक नामदेव खरात (वय 43), सतीश अर्जुन बाबर ( वय 46) दोघेही राहणार मर्ढे, ता. सातारा, विजयकुमार रघुनाथ बर्गे (वय 43) रा. वाढे फाटा, सातारा, सतीश सर्जेराव ढाणे (वय 46), विठ्ठल शिवाजी चोरगे (वय 29), दोघेही राहणार कोंडवे, ता. सातारा, विठ्ठल महादेव वाघमारे (वय 35), सुनील नवनाथ नागगोणे (वय 28), दोघेही राहणार वाढे, ता. सातारा, अमोल बबन सोनटक्के (वय 32), रा. पाटखळ, ता. सातारा हे 12 जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 लाख 45 हजार रुपये रोख रक्कम, 9 मोबाईल, 3 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: