Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातील 182 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 21 : सातारा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सजग झाले असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी सुरुची राडा प्रकरणासह अन्य गुन्ह्यामध्ये समावेश असलेल्या सातार्‍यातील 182 जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
2018 साली आनेवाडी टोलनाक्याच्या मुद्द्यावरून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गट एकमेकांना भिडले असते. मात्र तत्कालीन पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी शिष्टाई करून दोन्ही गटात होणारा संभाव्य  वाद टाळला होता. याच दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची राडा प्रकरण घडले होते. या प्रकरणी दोन्ही गटातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात 117 तर सातारा शहर पोलीस ठाण्यात 65 अशा एकूण 182 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. दि. 23 एप्रिल रोजी औद्योगिक वसाहत येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी 182 कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा बजावून त्यांना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. 
संबंधितांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर दि. 23 ते दि. 24 एप्रिल एक दिवसासाठी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: