Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुईंज येथे टेम्पोच्या धडकेत एक जण जागीच ठार, एक गंभीर
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re1
5भुईंज, दि. 21 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज येथे कृष्णा पुलावर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार, दि. 21 रोजी रात्री 10.15 च्या दरम्यान येथील कृष्णा पुलानजीक व आसले, ता. वाईच्या हद्दीतील मारूती मंदिरासमोर साताराकडून पुण्याकडे निघालेल्या आयशर टेम्पोने पुढे निघालेल्या मोटारसायकलला (क्र.केए 28 ईडी 3727) जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार रामसिंग रेवनू जाधव (वय 26, रा. सालोटगी तांडा नं. 1 ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) हा युवक जागीच ठार झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला भीमसिंग ठाकरू राठोड (वय 34, रा.  सालोटगी, ता.इंडी, जि. विजापूर, कर्नाटक हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर आयशर टेम्पो चालकाने पुण्याकडे पोबारा केला असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.
या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली असून सपोनि श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जाधव, हवालदार मुंगसे, हवालदार अवघडे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: