Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन 15 दिवसांनी मागे
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn2
वैद्यकीय प्रवेश : उच्च न्यायालयात कॅव्हेट
5मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी) : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी अखेर 15 व्या दिवशी आपले आंदोलन मागे घेतले. या विद्यार्थ्यांना मिळालेले कॉलेज आणि अभ्यासक्रम कायम ठेवण्यासाठी सरकारने काढलेल्या वटहुकूमानंतर सीईटीनेही प्रवेश कायम करण्यास हिरवा कंदिल दाखविला. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन विद्यार्थी आपापल्या कॉलेजांकडे रवाना झाले.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण कायम राहण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांकडून सलग 15 दिवस आंदोलन करण्यात आले. सरकारने काढलेल्या वटहुकुमाबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि सरकारचे आभार मानतानाच मराठा समाजाला पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करायला लावू नका, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
विनोद पाटील यांचे कॅव्हेट
राज्य सरकारने काढलेल्या या अध्यादेशाविरुद्ध कोणी न्यायालयात गेले तर निकाल मराठा विद्यार्थ्यांच्या विरोधात लागू नये यासाठी                   आर. आर. पाटील फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी समाजाच्यावतीने सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅड. संदीप देशमुख तर मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. विजय किल्लेदार हे बाजू मांडणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: