Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
1500 रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला पकडले
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: lo1
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5सातारा, दि. 20 : वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मोहन गुलाबराव भोसले, रा. चाहूर, भुईंज, ता. वाई यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार व त्याच्या शेजारी यांच्यामध्ये वाद झाले होते. तक्रारदार व त्याच्या शेजारी यांनी वाठार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करून यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मोहन गुलाबराव भोसले यांनी तक्रारदाराकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबतची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली.
दि. 20 मे रोजी तक्रारदार यांनी वाठार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन  पोलीस हवालदार मोहन गुलाबराव भोसले यांची भेट घेतली असता भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 1500 रुपये लाचेची मागणी करून ती लाच आज वाठार पोलीस स्टेशनच्या पाठीमागील मैदानामध्ये स्वीकारताना मोहन भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध वाठार पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: