Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एनडीएतील घटक पक्षांची आज बैठक
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na1
अमित शहा यांच्याकडून ‘डीनर’चा बेत
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : बहुतेक सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालापूर्वी उद्या (21मे) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांची बैठक बोलावली आहे.
एनडीएच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर उद्भवणार्‍या संभाव्य स्थितीवर चर्चा होणार आहे. यानिमित्ताने शहा यांच्याकडून सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांसाठी खास डीनरचाही बेत आखला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, 14 पैकी 12 एक्झिट पोलमध्ये एनडीएला 282 ते 365 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक 272 हा जादुई आकडा एनडीए सहज पार करेल, असे दिसत आहे. त्यामुळेच खासकरून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
निकालापूर्वी एनडीएचे एकीचे बळ दाखवून विरोधकांवर कडी करण्यासाठी शहा यांनी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यासाठी आता केवळ दोन दिवसच बाकी आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: