Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातून पावणेचार लाख रुपयांचे दागिने लंपास
ऐक्य समूह
Wednesday, May 15, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 14 : दि. 10 एप्रिल रोजी येथील मंगळवार पेठेतील एका फ्लॅटमधून एका कामगाराने 3 लाख 83 हजार 300 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुवर्णा विश्‍वास देशपांडे (वय 48), रा. बालाजीनगर अपार्टमेंट, 406, मंगळवार पेठ, सातारा यांच्या या राहत्या फ्लॅटमधील बेडरूममधील ड्रेसिंगच्या कप्प्यातून इलेक्ट्रिक फिटिंग व एसी सर्व्हिसिंगचे काम करणार्‍या एका कामगाराने दि.10 एप्रिल रोजी 1 लाख 50 हजार रुपये किमतीची 50 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली, 1 लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे काळे मणी व पांढर्‍या खड्याचे मणी मंगळसूत्र, 9 हजार रुपये किमतीचा एक पांढरा खडा असलेली 3 तीन ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, 60 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मिनी गंठण, 60 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व 7 ते 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, 4 हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे पैजण, दोन चांदीची जोडवी असा एकूण 3 लाख 83 हजार 300 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: