Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आनेवाडी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांची सातार्‍यातील पाच जणांना मारहाण
ऐक्य समूह
Monday, May 13, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: re1
5भुईंज, दि. 12 : आनेवाडी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांकडून गोडोली, सातारा येथील युवकास त्याच्या चार साथीदारासह  मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात चार ते पाच कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती सपोनि. श्याम बुवा यांनी दिली.
 या बाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोडोली येथील पाच युवक लग्नसोहळ्यासाठी असेंट कार (क्र. एम. एच. 10 बीएम 5337) मधून पुण्याच्या बाजूकडे जात असताना टोल नाक्यावर प्रसन्न प्रभाकर अवसरे (वय 28) यांनी टोल नाका कर्मचार्‍यांना आम्ही लोकल आहोत, असे सांगितले. या वरून सुरू झालेल्या वादावादीचे रूपांतर शिवीगाळ व कारमधील युवकांना मारहाण करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या प्रसन्न अवसरे याच्यावर  भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर सातारा येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. मारहाण झालेल्या युवकांमध्ये विजय रमेश पवार (वय 26), विशाल बळवंत जगदाळे (वय 27), सूरज भगवंतराव जगदाळे (वय 28), अनिकेत शहाजी घाडगे (वय 27) यांचा समावेश आहे. या बाबत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा  तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: