Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आयपीएलवर सट्टा घेणार्‍यास कराडमध्ये अटक
ऐक्य समूह
Friday, May 10, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 9 : आयपीएलमधील सामन्यावर सट्टा घेण्यासाठी येथील नगरपालिका परिसरात फिरत असलेल्या अभिजित आनंदा शेंद्रे (वय 24, रा. गुरुवार पेठ, कराड) यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयपीएल क्रिकेट मॅचवर शहरात सट्ट सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून नगरपालिका परिसरात सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या अभिजित शेंद्रे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे रोख 32 हजार रुपये व सट्ट्यासाठी लागणारे साहित्य सापडले. पोलीस उपनिरीक्षक सदाशिव शेलार, कर्मचारी प्रवीण पवार, चंद्रकांत पाटील, सौरभ कांबळे, संतोष चव्हाण यांनी ही कारवाई केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: