Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बरड येथे एस.टी.- बुलेट धडकेत दोन ठार
ऐक्य समूह
Friday, May 10, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re3
महिला गंभीर जखमी
5फलटण, दि. 9 : महाड-पंढरपूर राज्य रस्त्यावर बरड, ता. फलटण गावच्या हद्दीत एस.टी. बस आणि दुचाकी यांच्यात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, फलटण बाजूकडून पंढरपूरकडे जाणारी स्वारगेट-पंढरपूर एस.टी. बस (एमएच-07-सी-7130) आणि बुलेट मोटारसायकल (एमएच-13-व्ही-6729) यांचा फलटण येथून 18 कि.मी. अंतरावर बरड गावच्या हद्दीत भोईटे पेट्रोल पंपानजीक अपघात झाला. सौ. पूनम आकाश पंढरे (वय 25, रा. 22 फाटा, धुळदेव, ता. फलटण) यांच्या न्यायालयातील केससाठी जीवनधर श्रीरंग बजबळकर (रा. पिंपरी, ता. माळशिरस),   प्रेम आकाश पंढरे (रा. 22 फाटा, धुळदेव, ता. फलटण), सौ. पूनम आकाश पंढरे (वय 25, रा. 22 फाटा धुळदेव) हे बुलेट मोटारसायकलवरून पंढरपूरकडून फलटणकडे जात असताना फलटणकडून भरधाव वेगात आलेल्या स्वारगेट-पंढरपूर एस.टी. बसने बुलेटला जोराची धडक दिली. या अपघातात बुलेटवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी प्रेम आकाश पंढरे यांचा जागीच मृत्यू झाला तर जीवनधर श्रीरंग बजबळकर यांचा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सौ. पूनम पंढरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, एस.टी. बसचालक राजेंद्र नागुदास सातपुते (रा. पंढरपूर) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बोंबले तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: