Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते होणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) : यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने आता हा उद्घाटनाचा मान एका सामान्य महिलेला दिला आहे. वैशाली सुधाकर येडे असे या महिलेचे नाव असून ती एका आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची पत्नी आहे.
वैशाली येडे या कळंब तालुक्यातील राजूर येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची तीन एकर जमीन आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांच्या शेतकरी पतीने सात वर्षांपूर्वी नापिकीमुळे आत्महत्या केली. तेव्हापासून त्या ‘तेरव’ या नाटकाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येविरोधात काम करतात. हे नाटक श्याम पेठकर यांनी लिहिले असून हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केले आहे. वैशालीची या नाटकात प्रमुख भूमिका आहे.
एका सामान्य महिलेला साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटनाचा मान मिळाला आहे. महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी ही घोषणा केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: