Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मारुती कार व दुचाकी अपघातात एक जण ठार
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re2
5फलटण, दि. 6 : फलटण-दहिवडी रस्त्यावर दुधेबावी, ता. फलटण गावचे हद्दीत चौंडीमाता मंदिरासमोर रविवार, दि. 6 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, नवी कोरी मारुती सुझुकी सेल्युलर कार आणि हिरो होंडा मोटारसायकल (चक 11उट 1714) ही दोन वाहने समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक चंद्रकांत एकनाथ नाळे, वय 45, रा. वरचामळा, दुधेबावी, ता. फलटण यांना जबर मार लागून रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर दुधेबावी व परिसरावर शोककळा पसरली असून अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलीस पाटील हणमंतराव सोनवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली व गर्दीवर नियंत्रण ठेवून लोकांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान पोलीस उप निरीक्षक शेख, बीट हवालदार खाडे, पोलीस पाटील सोनवलकर यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हारुग्णालय, फलटण येथे पाठवून वाहतूक सुरळीत केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: