Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाच प्रकरणात योगींचे 3 मंत्री अडचणीत
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na1
5उत्तरप्रदेश, दि. 6 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे तीन मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या स्ट्रिंग ऑपरेशननंतर तीन मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना अटक करण्यात आली आहे.
योगी सरकारमधील मागास वर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे स्वीय सहाय्यक ओमप्रकाश कश्यप, उत्खनन मंत्री अर्चना पांड्ये यांचे स्वीय सहाय्यक एस. पी. त्रिपाठी आणि मूलभूत शिक्षण मंत्री संदीप सिंह यांचे स्वीय सहाय्यक संतोष अवस्थी यांना उत्तर प्रदेशच्या हजरतगंज पोलिसांनी अटक केली. याशिवाय, योगी आदित्यनाथ यांनी तिन्ही अधिकार्‍यांचे निलंबन केले असून चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: