Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंतप्रधानांची दिवाळी केदारनाथमध्ये
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 10:50 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथ मंदिरात साजरी करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी मंदिरात दाखल होतील. या ठिकाणी केदारनाथाची पूजा केल्यानंतर या परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
दरम्यान, मोदींच्या या केदारनाथ भेटीच्या पार्श्‍वभूमीवर एसपीजीचे एक पथक केदारनाथला पोहोचले आहे. या ठिकाणी त्यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.
केदारनाथमध्ये मोदी कोणतीही सभा घेणार नाहीत. मात्र, ते सरस्वती नदीच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: