Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सलग दुसर्‍या दिवशी पावसाने झोडपले
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5  : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत पावसाने शहर व उपनगरात दुसर्‍या दिवशीही दमदार बॅटिंग केली. दिवाळीच्या खरेदीसाठी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडणार्‍या चाकरमान्यांचा त्यामुळे हिरमोड झाला.
कर्नाटक जवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार  हजेरी लावली आहे. पुणे आणि परिसरात तर सकाळपासूनच पावसास सुरुवात झाली. रविवारी सायंकाळी जवळपास तासभर पावसाने बॅटिंग केल्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरूनही पाण्याचे लोट वाहत होते. काल देखील खरेदीसाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची त्यामुळे दैना झाली होती. छोट्या व्यावसायिकांचे त्यामुळे नुकसान झाले होते. मात्र सोमवारीही पावसाने सायंकाळच्या सुमारासच हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. उद्या दिवाळीची पहिली आंघोळ या शिवाय केरसुणी (लक्ष्मी) तसेच लक्ष्मी पूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला घराबाहेर पडल्या होत्या. परंतु आजही या पावसाने त्यांची निराशा केली. आजचा पाऊस कोठे कोठे झाला हे मात्र समजू शकले नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: