Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ढेबेवाडीत ट्रॅक्टर पलटी होवून चालकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: re4
5ढेबेवाडी, दि. 5 :  ढेबेवाडी विभागातील मालदन, ता. पाटण येथील वांग नदीवरील संगम पुला-नजीक घनकचरा वाहून नेणारा ट्रॅक्टर तीव्र उतारामुळे पलटी होवून अपघात झाला. या अपघातामध्ये दादासाहेब जगन्नाथ काळे हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे मालदन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे.
याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार, दि. 3 रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास मालदन येथील युवक दादासाहेब काळे हे ट्रॅक्टरमधून (क्र. एम. एच. 11 बी. 2304) ढेबेवाडी ग्राम-पंचायतीचा कचरा वाहून नेऊन वांग नदीच्या संगम पुलानजीक टाकण्यासाठी जात आसताना तीव्र उताराला ट्रॅक्टरवरचा ताबा सुटून ट्रॅक्टर  पलटी झाला. या अपघातात चालक दादासाहेब जगन्नाथ काळे (वय 35,  रा. मालदन) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेने मालदन गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. एस. वेताळ तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: