Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोक्का, एमपीडी अ‍ॅक्टच्या कारवाईचा धडका सुरूच राहणार
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: lo1
नूतन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची ग्वाही
5सातारा, दि. 5 : मोक्का, एमपीडीएसह विविध कारवाईचा धडाका पहिल्यासारखाच राहील. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मोक्कामध्ये जामीन होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणताही प्रसंग आला तरी त्याचा कायद्याच्या चौकटीतच राहून निपटारा केला जाईल. कायद्याच्या चौकटीत असेल ती कारवाई केली जाईल, अशी रोखठोक भूमिका नूतन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.  
पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांची इचलकरंजी येथून सातार्‍यात अप्पर पोलीस अधीक्षकपदी बढतीने बदली झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पद्भार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी पोलीस मुख्यालयात संवाद साधला.
धीरज पाटील म्हणाले, माझे शिक्षण सातारा जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे इथे काम करायला खूप आवडेल.  काम करताना आपली समन्वयाची भूमिका असून प्रभावीपणे काम करणार आहे.
मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सुरुवातीला मी शिक्षक होतो. 2009 मध्ये मी एमपीएससी अंतर्गत पोलीस उपअधीक्षक  झालो. ट्रेनिंग झाल्यानंतर आतापर्यंत मी चंद्रपूर, अहमदनगर, मिरज व इचलकरंजी येथे सेवा केली. अप्पर पोलीस अधीक्षक या नात्याने आपला क्राइमचा महत्त्वाचा रोल येतो. त्याबाबत कोणाचाही
मुलाहिजा बाळगणार नाही. पूर्वीप्रमाणेच या सर्व कारवाई अधिक प्रभावीपणे कशा राहतील हे पाहिले जाईल. मोक्कामध्ये जामीन मिळू नये, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. शहरासह जिल्ह्यात जी बेकायदेशीर हत्यारे सापडत आहेत त्याच्या मुळाशी जाणार आहे. पोलीस बंदोबस्त ज्यांना दिलेला आहे त्याबाबत माहिती घेवून आढावा घेणार आहे.
आगामी निवडणुकाबाबत विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी आपण सर्वच संवेदनशील ठिकाणी काम केले आहे. त्यामुळे आता कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सामोरे जाण्याचा पाठीशी अनुभव आहे. जे कायदेशीर आहे तेच होईल. पोलीस अधीक्षक हे पोलीस दलाचे प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ि
जल्ह्यात आपण सहकार्‍यांसमवेत काम करणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांशी आपला संवाद अधिक अधिक वाढवून सर्वांशी समन्वय ठेवला जाईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: