Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माणमध्ये वाळू वाहतुकीच्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: re3
प्रांताधिकार्‍यांच्या भरारी पथकाचा धडाका सुरुच
5पळशी, दि. 11 : माण तालुक्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने गुरुवारी पहाटे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या दोन ट्रॅक्टरवर वळई येथे तर एका ट्रॅक्टरवर म्हसवड येथे कारवाई केली. भरारी पथकाच्या कारवायांमध्ये सातत्य असल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
माण-खटाव तालुक्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्थापन केलेल्या पथकाने गेल्या चार महिन्यांपासून 73 वाहने पकडली असून या पथकाची वाळू माफियांनी धास्ती घेतली आहे. वळई व म्हसवड येथे गुरुवारी पहाटे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची खबर प्रांताधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार भरारी पथकातील कर्मचार्‍यांनी सापळा लावून वळई येथे भास्कर बळी काळेल यांचे दोन ट्रॅक्टर पकडले. त्यातील एका ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच-11-बीए-3068 आहे. या पथकाने म्हसवड येथे अमित पिसे यांचा ट्रॅक्टर (एमएच-45-एफ-3762) पकडला. या कारवाईची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याला कळवताच सपोनि मालोजीराजे देशमुख यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचार्‍यांना पाठवले. तलाठी संतोष ढोले, लिपिक रविराज शिंदे, पोलीस पाटील महेश शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, सुभाष काळेल यांनी ही कारवाई केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: