Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ट्रॅक्टर-ट्रॉलीला मोटारसायकल धडकून दोन ठार
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:48 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 10 : महाड-पंढरपूर राज्य महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून दुर्गादेवी मूर्ती बरडकडे घेऊन जाताना पवार वस्ती, पिंप्रद येथे रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीवर पिंप्रदकडे दुचाकीवरून जाणारे दोघे रात्रीच्या वेळी अंधारामुळे अंदाज न आलेने मागील बाजूस धडकल्याने ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास दुर्गादेवी मूर्ती घेऊन बरडकडे जात असताना विडणीनजीक पवार वस्ती येथे ट्रॅक्टर व ट्रॉली रस्त्यावर उभी असताना पिंप्रदकडे जाणार्‍या मोटारसायकल (एमएच-11-बीएस-9612) वरील स्वारास रस्त्याचा व वाहनाचा अंदाज न आलेने ट्रॉलीला 
(एमएच-11-बीएच-869) मोटारसायकल धडकून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी विडणी येथील तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झालेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आज पुन्हा दोघांचा अंत झाला. उमाजी खाशाबा मदने (वय 37) आणि हरी रामचंद्र
पवार (वय 55, दोघे रा. पिंप्रद, ता. फलटण) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: