Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जेट एअरवेजच्या विमानाचा 36 हजार फुटांवर पुन्हा थरार
ऐक्य समूह
Monday, October 01, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : हैदराबाद विमानतळावरून उड्डाण केलेल्या जेट एअरवेजच्या विमानात 36 हजार फुटांवर गेल्यानंतर तांत्रिक बिघाड झाला. परंतु पायलटने प्रसंगावधान राखून या विमानाचे इंदूर विमातळावर इमरजन्सी लँडिंग केल्यामुळे विमानातील 96 प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.
रविवारी सकाळी 10 वाजून 48 मिनिटांनी जेट एअरवेजच्या विमानाने हैदराबाद विमातळावरून उड्डाण केले. जेट एअरवेजचे 737 एअरक्राफ्ट 36 हजार म्हणजे जवळजवळ 11 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर आणि 850 ताशी वेगात असताना अचानक विमानातील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या विमानात एकूण 103 जण होते. 
त्यात 96 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर होते. विमानात बिघाड झाल्याचे कळताच एअरलाइनने अ‍ॅथॉरिटिज आणि जेट एअरवेजच्या इंजिनिअरिंग टीमला याची माहिती दिली. इंजिनात बिघाड आल्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखून विमानाचा वेग कमी केला. त्यानंतर इंदूर विमानतळावर दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी इमरजन्सी लँडिंग केले. पायलटच्या प्रसंगावधनामुळे विमानातील 96 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: