Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
न्यायालयाच्या आवारातून पोलिसाचीच दुचाकी चोरीस
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 7 : सातारा जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले पोलीस सुनील सर्जेराव सावंत (वय 51, रा. सातारा) यांची दुचाकी जिल्हा न्यायालयाच्या आवारातूनच  चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गेल्या चार वर्षांपूर्वी अशाचप्रकारे जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून पोलिसाच्या दुचाकीची चोरी झाली होती व त्याच दुचाकीवर पुणे येथे बॉम्बस्फोट झाला होता.
जिल्हा न्यायालयात पोलीस हवालदार सुनील सावंत कार्यरत आहेत. दि. 6 रोजी सकाळी ते न्यायालयात आल्यानंतर त्यांनी स्वत:ची दुचाकी पार्किंगमध्ये पार्क केली. दुपारी दीड वाजता पाहिल्यानंतर दुचाकी पार्किंगमध्ये उभी होती. सहा वाजता न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर ते पार्किंगमध्ये गेले असता तेथे दुचाकी नव्हती. परिसरात सर्वत्र शोधल्यानंतरही दुचाकी नसल्याने अखेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: