Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हाधिकारी कार्यालयातूनच तहसीलदारांची रोकड लांबवली
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 10:40 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातून चंदनचोरी झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय 40, रा. सातारा) यांच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबवली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता तळेकर-धुमाळ या बुधवारी दिवसभर त्यांच्या दालनात काम करत होत्या. सायंकाळी बैठकीच्या कामानिमित्त त्या जिल्हा-धिकार्‍यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवली होती. चोरट्यानी हीच संधी साधत त्यांची पर्स लंपास केली. त्या पर्समध्ये दहा हजार रुपये, बँकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती. तहसीलदार अमिता तळेकर यांची बैठक संपल्यानंतर त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलवर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र पाहिल्यानंतरही पर्स नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. त्यानंतर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: