Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील चेन लंपास
ऐक्य समूह
Thursday, September 06, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 5 : मलकापूर-कराड रस्त्यालगत फॉरेस्ट ऑफिस समोर दुचाकीवरून आलेल्या दोेन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चेन धूम स्टाईलने चोरून नेली.
याबाबत श्रीमती छबूताई श्रीकांत पाडळे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमती छबूताई श्रीकांत पाडळे (वय 68, रा. आगाशिवनगर, मलकापूर, कराड) या मंगळवार, दि. 4 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मैत्रिणीबरोबर घरी निघाल्या होत्या. येथील फॉरेस्ट ऑफिस रोडवर आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पाडळे यांच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरून नेली. यामध्ये 22 ग्रॅम वजनाची 33 हजार रुपये किंमतीची चेन चोरट्यांनी धूम स्टाईलने चोरली. या प्रकरणी कराड शहर पोलिसात दोन अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: