Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिलीपकुमार रुग्णालयात दाखल प्रकृतीत सुधारणा
ऐक्य समूह
Thursday, September 06, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 5 (वृत्तसंस्था) : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (वय 95) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुफ्फुसांना जंतुसंसर्ग झाल्याने त्यांना श्‍वास घेण्यात त्रास होत होता. त्यांची प्रकृती चिंताजनक नसून सुधारत असल्याचे रुग्णालयाच्या डॉ. अजय पांडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना घरी सोडण्याबाबत उद्या (गुरुवार) निर्णय घेण्यात येणार असल्याचेही डॉ. पांडे यांनी सांगितले.
दिलीपकुमार यांच्या ट्विटर हँडलवरूनही त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. दिलीपकुमार यांनी वयाच्या 22 व्या वर्षी 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र, 1947 मध्ये आलेल्या ‘जुगनू’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली. ‘मुघल-ए-आझम’ यासह असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या असून अनेक दिग्गज अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयशैलीचे अनुकरण केले आहे. आपल्या कारकिर्दीत दिलीपकुमार यांनी 65 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘किला’ या चित्रपटानंतर दिलीपकुमार यांनी चित्रसृष्टीला रामराम ठोकला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: