Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केरळमध्ये पुरानंतर रोगांचे आव्हान, 50 जणांचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, September 03, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na1
5केरळ, दि. 2 (वृत्तसंस्था) : केरळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर आता आजारांचे संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत 50 जणांचा दूषित पाण्यामुळे होणार्‍या रोगांमुळे मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे केरळमध्ये लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली आहे. यामुळे 6 जण दगावले आहेत. अन्य 34 जणांच्या मृत्यूचे कारणही लेप्टोस्पायरोसिसच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त 9 जण तापामुळे तर एक जण डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडला आहे. लेप्टोस्पायरोसिसग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण 159 जणांना लेप्टोस्पायरोसिसने ग्रासले आहे. पुरामुळे 104 लोकांना डेंग्यू आणि 50 हून अधिक जणांना मलेरिया झाला आहे.  दरम्यान, केरळमध्ये पुरामुळे आतापर्यंत 370 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 10 लाखांहून जास्त लोक विस्थापित झाले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: