Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुचाकीच्या अपघातात धुळदेव येथे वृद्ध ठार
ऐक्य समूह
Saturday, September 01, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re2
5फलटण, दि. 31 : गणेशशेरी, धुळदेव, ता. फलटण येथे भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून वृद्धाला जोरदार धडक दिल्याने त्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, गणेशशेरी येथे सीताराम मारुती घनवट यांनी मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. 11 बीएल 4841) जाताना विठ्ठल संभाजी शिंदे (वय 68, रा.धुळदेव) यांना  जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सीताराम घनवट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आ. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: