Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हासुर्णे येथे वेदपाठक ज्वेलर्समध्ये चोरी
ऐक्य समूह
Thursday, August 30, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: re3
अडीच लाखाचा ऐवज लंपास
5पुसेसावळी, दि. 29 : म्हासुर्णे, ता. खटाव येथील मंगळवार पेठेतील वेदपाठक ज्वेलर्स या नावाच्या दुकानात मंगळवारी रात्री 1 ते 2 च्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून अंदाजे अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
 म्हासुर्णे गावातील मुख्य पेठेत अक्षय वेदपाठक यांच्या मालकीचे वेदपाठक ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी मंगळवारी रात्री शटर उचकटून, दुकानात प्रवेश करून सोने व चांदीचे (अंदाजे अडीच लाख) दागिने लंपास केले. मुख्य पेठेतील दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी  व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी अनेक दुकाने व घरांमध्ये या अगोदर चोर्‍या झाल्या आहेत. त्याचा अद्याप तपास लागला नाही. आता चोरट्यांनी वेदपाठक ज्वेलर्समध्ये चोरी करून पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. या चोरीचा तरी पोलीस यंत्रणेने तपास लावावा, अशी मागणी होत आहे.  
चोरीची नोंद मायणी पोलीस स्टेशनला झाली आहे. संतोष गोसावी तपास करत आहेत.
रात्रगस्त घालण्याची मागणी
म्हासुर्णे गावात व परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी तसेच अत्यावश्यक ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: