Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हसवडमध्ये वरुण यज्ञाद्वारे कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी
ऐक्य समूह
Thursday, August 30, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: re3
5म्हसवड, दि. 29 : वरुण यज्ञ करून म्हसवडमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग प्रख्यात संशोधक श्रीहरी उर्फ राजा मराठे यांनी यशस्वी करून दाखविला. या प्रयोगाने म्हसवड परिसरात पावसाच्या धारा बरसू लागल्या.
माण तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या रेंगाळल्या. पाऊस पडेल या अपेक्षेने ज्या गावाच्या शेतशिवारात शेतकर्‍यांनी धुळफेक पेरण्या केल्या आहेत तीही पिके पुरेशा पावसाअभावी कोमेजून गेली आहेत. आकाशी काळेकुट्ट ढग ज्या वेगाने येत आहेत त्याच वेगाने ते पूर्वेकडे जात आहेत. पाऊस काही पडत नाही. ऐन पावसाळ्यात माण नदीचे पात्र कोरडेच राहिले आहे. परिणामी विशेषत: पूर्व म्हसवड भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होऊ लागली आहे. आकाशातून वाहत जाणारे पाऊस सदृश  काळे ढग अडवून ते बरसण्यास भाग पाडण्यास शास्त्रीय आधारावरील वरुण यज्ञ  करण्याचा मनोदय माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केला व माणदेशी फौंडेशनद्वारे माण तालुक्यात गावोगावी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबिण्यास पुणे येथील तज्ञ श्रीहरी उर्फ राजा मराठे यांना म्हसवड येथे निमंत्रित करण्यात आले. मराठे यांनी वरुण यज्ञ  प्रज्वलित करताच रविवारी सकाळी समाधान -कारक यश आले व काही अवधीतत पावसाची बरसात झाली. काल दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी पडतच राहिल्या.
वरुण यज्ञाविषयी माहिती सांगताना मराठे म्हणाले, पावसासाठी हा यज्ञ उपक्रम अंधश्रद्धा नव्हे तर तो शास्त्रीय कारणावर आधारित आहे. लँगम्युअर चेंज रिअ‍ॅक्शन’ म्हणून हा प्रयोग परिचित आहे. आकाशात ढग येत जात असतात. काही वेळा ते टिकूनही जागचे जागी राहतात. आता नक्की पाऊस पडेल असेच आकाशी वातावरण निर्मिती होते. परंतु पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची निराशा होते. पावसाळा संपून जातो व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. 1948 मध्ये नोबल पारितोषिक विजेता लँगम्युअर या शास्त्रज्ञाने ’चेंज ऑफ रिअ‍ॅक्शन’ प्रयोगात मिठाचा वापर करून पाऊस पाडता येतो हे सिद्ध करून दाखवले होते. परंतु या प्रयोगापासून समाज दूर राहिल्याने परिणामी दुष्काळाच्या संकटास सामोरे जावे लागले. या प्रयोगाचा कोणी पुरेसा फायदा करून घेतला नाही. हाच प्रयोग मी राज्यभर राबवित आहे व त्यास समाधानकारक यशही आले आहे. अनेक गावात वरुण यज्ञ करून पाऊस पाडून दाखविलेला आहे.
वरुण यज्ञ तंत्रज्ञानाबाबतची शास्त्रीय माहिती देताना ते म्हणाले, हवेतील बाष्प एकत्रित येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एकाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. ढगाच्या सूक्ष्म कणावर बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला, की पावसाचा थेंब तयार होतो. पाणी शोषून घेणे हा मिठाचा गुणधर्म आहे. मिठात पाण्याचा थेंब आकृष्ट करण्याची शक्ती आहे. वरुण यज्ञात मिठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मीठ पेटत्या यज्ञात वरच्यावर टाकताच त्याचे कण धुरासोबत उंच आकाशी उडत जातात व ते ढगातील पाण्याचे कण शोषून घेतात व त्याचे पाण्याच्या थेंबात रूपांतर करत पाऊस पडण्यास सुरुवात होते. या प्रयोगासाठी आकाशात पुरेशा प्रमाणात ढग असणे गरजेचे आहे. विमानाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा हा प्रयोगही असाच आहे. परंतु तो खर्चिक आहे. वरुण यज्ञ हा प्रयोग खर्चिक
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: