Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बावधन येथे एकाच रात्रीत सहा घरे फोडली
ऐक्य समूह
Thursday, August 30, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: re2
5वाई, दि. 29 : बावधन (ता. वाई) येथील साईनगर परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सहा बंद घरे फोडून धुमाकूळ घातला. यात दिनकर राऊत यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला तर शेजारील सहा बंद घरांचे कडी कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न केला.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, साईनगर, नवीन गावठाण, बावधन येथील दिनकर गणपती राऊत हे सोमवार, दि. 27 रोजी घर बंद करून कुटुंबासह  मुंबई येथे गेले होते. मंगळवारी  पहाटे 5.30 वाजता ते घरी परतले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 25 हजार रुपये रोख असा 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यावेळी चोरट्यांनी शेजारील मिलिंद शिवाजी भोसले, रावसाहेब रामचंद्र भोसले,  पोपट बाबूराव पिसाळ, किसन बाबूराव पिसाळ, बाबूराव गणपती राऊत यांच्या बंद घरांचे कडी कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती पोलिसांना समजताच सातारा येथून श्‍वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍वान मुख्य रस्त्यापर्यंत येवून घुटमळले. याबाबतची फिर्याद दिनकर राऊत यांनी पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक फौजदार एम. एस. निंबाळकर तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: