Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
येणपे येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, August 29, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: re4
5उंडाळे, दि. 28 : जनावरे चारण्यास घेऊन गेलेल्या येणपे, ता. कराड येथील महिलेचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आला. मंगळवारी ही घटना उघडकीस आली. महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा येणपेसह परिसरात सुरू आहे. सविता गणेश पाटील (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सविता पाटील ही महिला सोमवार, दि. 27 रोजी दुपारी 12 वाजता नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी वाघजाईच्या समोर खडी नावाच्या रानात धरणाजवळ गेली होती.    
मात्र, जनावरे चरून सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी का आली नाहीत  म्हणून कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दिली.  दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सविता पाटील यांचा मृतदेह धरणाच्या जवळ विवस्त्रावस्थेत सापडला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. सविताचा मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने तिचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा आहे. मात्र तिचा मृत्यू कसा झाला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी उंडाळे पोलीस तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: