Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजवाडा, मंगळवार पेठेतील तीन मटका अड्ड्यांवर छापे
ऐक्य समूह
Wednesday, August 29, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 28 : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा, मंगळवार पेठ येथील तीन मटका अड्ड्यांवर सोमवारी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 50 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या करवाईत सात जणांना अटक केली आहे.
यामध्ये दत्तात्रय शंकर जगताप, राजन अशोक सांडगे (दोघे रा. यादोगोपाळ पेठ), संदीप सर्जेराव शिंदे (रा. करंजे), मकरंद प्रभाकर कुलकर्णी (रा. यादोगोपाळ पेठ), जावेद सलीम सय्यद (रा. गुरुवार पेठ), संतोष सूर्यकांत कांबळे (रा. शुक्रवार पेठ), प्रमोद जगन्नाथ बल्लाळ (रा. बुधवार पेठ), शहाजी उत्तम कदम (मंगळवार पेठ) या संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.    
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी मटका, जुगारचा धंदा सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तयार करुन छापे टाकले असता तीन ठिकाणी कारवाई झाली. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: