Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माझे सरकार पाडण्याचे कारस्थान : कुमारस्वामी
ऐक्य समूह
Monday, August 27, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn4
5बेंगळुरू, दि. 26 (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कुणाचेही नाव न घेता माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप केला. कुणी कितीही कारस्थाने केली तरी त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, माझे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र मी माझी खुर्ची वाचवण्यासाठी पूर्ण बळ लावणार आहे. माझे काम अधिक चांगले करण्यावर माझा भर असणार आहे. 
यावेळी कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्या यांचा नामोल्लेख केला नाही. मात्र, त्यांच्या टीकेचा रोख सिद्धरामय्या यांच्याकडेच होता. माझ्याविरोधात कारस्थाने रचणारे यशस्वी होणार नाहीत. मी राज्यात सुशासन देण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझे सरकार लवकरच 100 दिवसांचा टप्पा पूर्ण करणार आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले.
दरम्यान, जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष ए. एच. विश्‍वनाथ यांनी सिद्धरामय्या यांचे नाव घेऊन टोला लगावला. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल पण ते कोणत्या पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री होणार आणि त्यांना कुणाचा पाठिंबा असणार, असा खोचक सवाल केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: