Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदारांच्या बदल्या
ऐक्य समूह
Saturday, August 25, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 24 : राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या शुक्रवारी प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातार्‍याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, कराडचे तहसीलदार राजेंद्र शेळके, खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, महाबळेश्‍वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या बदल्या झाल्या आहेत.
सातार्‍याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील यांची सांगलीच्या भूसंपादन क्र. 6 च्या उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली. वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांची पुणे जिल्हा धान्य वितरण अधिकारी म्हणून तर जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची सांगली येथे भूसंपादन क्र. 1 उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. सिडकोचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांची सातारच्या प्रांताधिकारीपदी बदली करण्यात आली असून वाईच्या प्रांताधिकारीपदी गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील सहाय्यक आयुक्त स्नेहा किसवे यांची जिल्हा पुरवठा अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भूसंपादन क्र. 9 चे उपजिल्हाधिकारीपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. तत्कालीन अधिकार्‍यांच्या बदलीनंतर या ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नव्हता. जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे येथे पूर्ण वेळ अधिकार्‍याची आवश्यकता होती. आता ही नियुक्ती झाल्याने या विभागाचे काम सुरळीत होणार आहे. जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कराडचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांची उजनी प्रकल्प तहसीलदार (पुनर्वसन) म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी गडहिंग्लजचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. माळशिरसच्या तहसीलदार बाई एस. माने यांची माणच्या तहसीलदारपदी,
 हातकणंगलेच्या तहसीलदार वैशाली राजमाने यांची सातारा तालुका संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.
राजमाने यांनी यापूर्वी नायब तहसीलदार म्हणून सातारा येथे काम पाहिले होते. वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची पुरंदरच्या
तहसीलदारपदी तर त्यांच्या जागी महाबळेश्‍वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची बदली झाली आहे. महाबळेश्‍वरच्या तहसीलदारपदी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार मीनल कळसकर यांची नियुक्ती झाली आहे. सातारा तालुका संजय गांधी योजनेच्या
तहसीलदार जयश्री आव्हाड यांची खटावच्या तहसीलदारपदी तर खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची करमाळा तहसीलदारपदी बदली झाली आहे. सातारचे तत्कालीन तहसीलदार राजेश चव्हाण यांची
तीन वर्षांपूर्वी गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे तहसीलदारपदी बदली झाली होती. आता त्यांची पुन्हा कराडच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: