Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात काविळीमुळे तरुण पोलिसाचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 11 :  सातारा जिल्हा पोलीस दलातील स्वप्निल
किशोर
जाधव (वय 32, रा.चिमणपुरा पेठ) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाधव यांना कावीळ झाली असल्याचे समोर आले आहे.  या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस हवालदार स्वप्निल जाधव हे सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कावीळ झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने  त्यांचा त्यात मृत्यू झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: