Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भरतगाव येथे हॉटेलच्या कूकचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: lo2
x5सातारा, दि. 8 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाव, ता. सातारा येथे एका धाब्यावर कूक असणार्‍या राकेश शर्मा (वय 50, रा. भरतगाव, ता. जि. सातारा)  यांचा रविवारी अचानक मृत्यू झाला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  हॉटेल राजमार्ग येथे राकेश शर्मा हे कूक होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अशक्तपणा आणि दम्याच्या त्रासामुळे अचानकपणे चक्कर आली आणि यामध्ये ते खाली पडले.  ही घटना हॉटेलमधील दुसरे कूक प्रशांत माधवन शेटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राकेश यांना बेशुध्दावस्थेतच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथेे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: