Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सोनाईचीवाडी येथे जुगार खेळताना सात जण सापडले
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:43 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : सोनाईचीवाडी, ता. पाटण येथे तीन पत्ती जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात जणांना अटक केली आहे. 
अटक करण्यात आलेल्यांची हणमंत शंकर मुळीक (वय 47), दादासाहेब रामचंद्र कदम (वय 43), नथुराम पोपट लोहार (वय 28), गुंडा बाबूराव जाधव (वय 50), हणमंत बाबूराव जाधव (वय 50), सचिन रामचंद्र देसाई (वय 34) आणि अशोक शामराव माने (वय 45, सर्व रा. सोनाईचीवाडी, ता. पाटण) अशी नावे आहेत.
सोनाईचीवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीमध्ये सिध्दनाथ मंदिराच्याशेजारी असलेल्या अशोक शामराव माने यांच्या मालकीच्या शेडच्या आडोशास तीन पत्ती नावाचा जुगार पैजेवर पैसे लावून खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हवालदार तानाजी माने यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करुन त्यांना छापा टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार छापा टाकला असता 7 जण जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडील 95 हजार 460 रुपये किमतीचे जुगार साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट व मोटारसायकल असा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या सूचनेप्रमाणे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी माने, विजय शिर्के, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले यांनी कारवाई केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: