Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:47 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : समर्थमंदीर ते बोगद्याकडे जाणार्‍या मार्गावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये आई, वडील आणि मुलगी यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. जखमी झालेल्यांची सुरेश रामदास निकम (वय 45), लक्ष्मी सुरेश निकम (वय 45) आणि हर्षाली सुरेश निकम (वय 13, सर्व रा. झरेवाडी, पो. करंडी, ता. जि. सातारा) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,  एकाच कुटुंबातील तीन जण शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बोगदा परिसरात निघाले होते. समर्थमंदिराकडून जाताना त्यांच्या दुचाकीला दुसर्‍या एका दुचाकीची धडक बसली. यामध्ये ते  तीन जण गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: