Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी राजीव सातव
ऐक्य समूह
Saturday, March 31, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार आणि युवा नेते राजीव सातव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावर त्यांची नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून परिपत्रक काढून या संदर्भात घोषणा करण्यात आली. परिपत्रकात म्हटले आहे, की खासदार राजीव सातव यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राऊंड. पंतप्रधानांच्या होमग्राऊंडवर काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी राजीव सातव यांच्या रूपाने एका मराठी आणि तरुण नेत्यावर आली आहे. विशेष म्हणजे, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवेळी खासदार राजीव सातव यांनी सहप्रभारी म्हणून काम पाहिले होते आणि गुजरातमध्ये भाजपला जेरीस आणण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. तिथे त्यांच्यावर हल्लाही झाला होता.  
आता काँग्रेसचे प्रभारी म्हणून राजीव सातव हे कसे काम करतात आणि मोदींना होमग्राऊंडवर किती आव्हान उभे करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: