Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अ‍ॅट्रॉसिटीमध्ये आता तातडीने अटक नाही : सर्वोच्च न्यायालय
ऐक्य समूह
Wednesday, March 21, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : कोणत्याही सरकारी अधिकार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटीचा आरोप करून त्याला थेट अटक करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आज या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला, ज्यामुळे सरकारी अधिकार्‍यांसह सामान्य व्यक्तींनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करता येईल. न्यायमूर्ती उदय ललित आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
विशेष म्हणजे केवळ सरकारी नोकरच नव्हे तर इतर सामान्य व्यक्तींनाही अशाच प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे. एसएसपी (ीशपळेी र्ीीशिीळपींशपवशपीं ेष िेश्रळलश)  दर्जाच्या अधिकार्‍यांची परवानगी त्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या स्तरावर अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल, त्यातून केवळ अ‍ॅट्रॉसिटीद्वारे अडकवण्याचा तर हा प्रकार नाही ना, हे सिद्ध झाल्यावरच पुढची कारवाई करता येणार आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर वाढू नये, त्यातून चुकीच्या लोकांना शिक्षा होऊ नये, यासाठी अशा पद्धतीची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सुभाष काशीनाथ महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: