Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहंदीला 2 वर्षे तुरुंगवास,जामीन
ऐक्य समूह
Saturday, March 17, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: mn2
5पतियाळा, दि. 16 (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला 2003 मधील मानवी तस्करी प्रकरणात पंजाबमधील एका स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंग यालाही या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सध्या दलेर मेहंदी पंजाब पोलिसांच्या कोठडीत आहे. शिक्षा सुनावल्यानंतर त्याला लगेच जामीन मंजूर करण्यात आला. या निर्णयाच्या विरुद्ध आपण वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवैधरीत्या लोकांना विदेशात पाठवल्या प्रकरणी दलेर मेहंदी आणि शमशेर सिंग या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 1998 आणि 1999 या कालावधीत या दोघांनी 10 जणांना अवैधपणे अमेरिकेला पाठवले होते. त्यासाठी त्यांच्याकडून पैसेही घेतले होते. या प्रकरणी दोघांविरोधात 2003 मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. दलेरने 1998 आणि 1999 मध्ये अमेरिकेत शो केले होते. टीममधील 10 सदस्यांना अमेरिकेत सोडून तो भारतात परतला होता. त्याचवेळी एका नायिकेसोबत अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेल्या दलेरने आपल्या टीममधील तीन मुलींना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोडले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: