Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बैलगाडा मालकांचे पुण्यातील आंदोलन पोलिसांनी दडपले
ऐक्य समूह
Thursday, March 15, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 14 (प्रतिनिधी) : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडा मालकांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री दडपले. मध्यरात्री दीड वाजता चारशे ते पाचशे पोलिसांनी बैलगाडा मालकांना तेथून जबरदस्तीने हुसकावून लावले. मंडपाची तोडफोड करून सामानाची फेकाफेक केली, असा आरोप बैलगाडा मालकांनी केला आहे.
बैलगाडा शर्यतींना विरोध करणारी ‘पेटा’ संस्था आणि प्राणिमित्रांवर कारवाई करावी आणि बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी  अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सुरू केले होते. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता बैलगाडा मालकांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यासोबतचे बैल कोंडवाड्यात नेले. त्यानंतर मालकांना जामीन देऊन सोडून दिले. मात्र, त्यांचे बैल अजूनही कोंडवाड्यात आहेत. त्यानंतरही बैलगाडा मालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी पुन्हा जमले होते.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: