Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिबी येथे जुगार खेळणार्‍या तंटामुक्तीच्या माजी अध्यक्षासह पाच जणांना अटक
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 7 : बिबी, ता.फलटण येथे पत्त्याच्या पानावर जुगार खेळणार्‍या तंटामुक्ती समितीच्या माजी अध्यक्षासह 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची बळवंत लक्ष्मण नलवडे (वय 63, रा.बिबी), आबा बबन तरडे (वय 48, रा.मलवडी), प्रकाश बबन बोबडे (वय 45, रा.बिबी), संजय लक्ष्मण टकले (वय 38, रा.मलवडी), गणेश विठ्ठल नाकयवडी (वय 40, रा.आळजापूर, सर्व ता.फलटण) अशी नावे आहेत. यामधील बळवंत नलवडे हा तंटामुक्ती समितीचा माजी अध्यक्ष आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेला बिबी गावच्या हद्दीत जुगार खेळला जात असल्याची माहिती  मिळाली होती. पोलिसांनी पथक करून त्यानुसार छापा टाकला असता संशयित मोकळ्या रानात बाभळीच्या झाडाखाली जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तेथून पोलिसांनी दुचाकी, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला असून तो जप्त करण्यात आला. पोलिसांनी हा छापा टाकला त्यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व संशयित व मुद्देमाल ताब्यात घेवून लोणंद पोलिसांकडे वर्ग केले आहे. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलीस हवालदार नागे, मोहन नाचण, रवींद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कचरे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: