Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 7 :  भूविकास बँक चौकात  असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या घटनेत चोरट्यांच्या हाती कोणतीही रक्कम लागली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन  अतिशय वर्दळीच्या परिसरात असून तेथे कायम गजबज असते. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास  चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँकेच्या गार्डला फोडाफोडीचा  आवाज आल्याने बाहेर येवून पाहिले असता संशयित दोघेही दिसले. गार्डने संशयितांना हटकल्यानंतर ते दोघेही दुचाकीवरून पसार झाले. गार्डने एटीएममध्ये जावून पाहणी केल्यानंतर मशीन उचकटले असल्याचे दिसले.  
बुधवारी सकाळी याबाबतची माहिती बँक अधिकार्‍यांना दिल्यानंतर सचिन प्रदीप भंडारी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: