Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘नीट’ला ‘आधार’सक्ती नाही
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: na1
केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : देशातील लाखो विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने आधार सक्तीतून तात्पुरता दिलासा दिला आहे. येत्या 6 मे रोजी होणार्‍या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नीट)परीक्षाचा अर्ज भरताना आधार क्रमांकाची सक्ती करणे गरजेचे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नीट परीक्षा घेणार्‍या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनला (सीबीएसई) सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की विद्यार्थ्यांना परीक्षाचा अर्ज भरताना आधार क्रमांक सक्ती करू नये. या परीक्षेसाठी 9 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तोपर्यंत हा अंतरिम आदेश असेल. ओळखपत्र म्हणून परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पासपोर्ट, रेशनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र किंवा बँक पासबुक ग्राह्य धरावेे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेतील घटनापीठाचे 5 न्यायाधीश नीट नोटिफिकेशनविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करत आहे. बोर्डाने साईटवर माहिती अपलोड करावी, वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सीबीएसईला म्हटले आहे, की नीट-2018 साठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना आधार सक्ती करू नये. हा आदेश 9 मार्चपर्यंत लागू राहाणार आहे. 9 मार्चपर्यंत नीटची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 
बोर्डाने ही माहिती आपल्या वेबसाइटवर अपलोड करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. दुसरीकडे, आधार देणार्‍या यूआयडीएआयने न्यायालयाला सांगितले, की मेडिकल एंट्रन्स टेस्टसाठी सीबीएसईने आधार अनिवार्य करावे, असा अधिकार आम्ही त्यांना दिलेला नाही. नीटसाठी अर्ज भरण्याची अखेरीच तारीख 9 मार्च असून 6 मे रोजी परीक्षा होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: