Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: mn3
5नागपूर, दि. 6 (वृत्तसंस्था) :  छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर अक्षरश: धुमाकूळ घातला. माओवाद्यांनी जगदलपूरवरुन हैद्राबादकडे जाणार्‍या तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळल्या. या बसमध्ये प्रवास करणार्‍या एका निवृत्त पोलीस कर्मचार्‍याची त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
छत्तीसगडमध्ये दोरनापाल गावाजवळ सोमवारी मध्यरात्री जवळपास 100 माओवादी सुकमा-हैद्राबाद महामार्गावर आले. त्यांनी महामार्गावर तीन बसेस आणि तीन ट्रक जाळले. यातील एका बसमध्ये पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी प्रवास करत होता. माओवाद्यांनी त्यांची हत्या केली. जवळपास दोन तास माओवाद्यांचा हा धुमाकूळ सुरू होता.
शुक्रवारी तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत 10 माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: