Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मटकाकिंग समीर कच्छीसह तेरा जण दोन वर्षासाठी तडीपार
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 6 : सातारा शहरातील मटकाकिंग समीर सलीम कच्छी याच्यासह 13 जणांना दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालवणारे टोळीप्रमुख समीर सलीम कच्छी (वय 35, रा. यश ढाब्याच्यापाठीमागे मोळाचा ओढा, सातारा), टोळी सदस्य प्रभाकर बलदेव मिश्रा (वय 45, रा. श्री. व सौ. अपार्टमेंट, शाहूनगर, सातारा), सुनील अनिल कुंभार (वय 22, रा. संगमनगर कॅनॉलजवळ, सातारा), अकबर हुसेन शेख (वय 43, रा. 411, शनिवार पेठ, सातारा), रमेश दिनकर जावलीकर (वय 43, रा. कोलाटेवस्ती, कामाठीपुरा, सातारा), महेश जगन्नाथ जगताप (वय 35, रा. 139, शाहूनगर, गोडोली, सातारा), जमीर गणीभाई शेख (वय 32, रा. 425, गुरुवार पेठ, सातारा), अरुण रामचंद्र माने (वय 41, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा), वसीम इब्राहिम शेख (वय 30, रा. 41, शनिवार पेठ, सातारा), किरण शिवाण्णा शेट्टी (वय 42, रा. चंदननगर, कोडोली, सातारा), सलीम बाबूलाल पठाण (वय 52, रा. 466, मंगळवार पेठ, सातारा), अरुण भगवान शिंदे (वय 56, रा. गोडोली, सातारा) आणि अमृत विलास खांडेकर  (वय 26, रा. 546, मंगळवार पेठ, सातारा) यांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये करण्यात आली आहे. या तेरा जणांना सातारा, कोरेगाव, वाई, जावली, महाबळेश्‍वर, खंडाळा, फलटण, खटाव, कराड, पाटण या दहा तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.  ही टोळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मटका घेत होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करुन त्यांना सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: