Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कार्ती चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाची चौकशी यापुढेही सुरू ठेवू शकता, असे न्यायालयाने ईडी आणि सीबीआयला नोटीसद्वारे सांगितले. पुढची सुनावणी दि. 9 रोजी होणार आहे.
वृत्तानुसार, कार्ती यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
ईडी आणि सीबीआयने सुरू केलेली चौकशी बंद करण्याबाबत सध्या कोणताही आदेश देता येणार नाही. या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांवर तपास यंत्रणांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, ईडीकडून होत असलेल्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी कार्ती यांनी याचिकेद्वारे केली होती. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: