Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मेघालयात कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: na4
5शिलांग, दि. 6 (वृत्तसंस्था) : नॅशनल पिपल्स पार्टीचे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मेघालयाचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी त्यांना आमंत्रित केले होते. मेघालयात पाच पक्ष आणि एका अपक्षाच्या समर्थनाने एनडीएचे सरकार सत्तेवर बसले आहे.
भाजपने रचला इतिहास : राजनाथ सिंह
कोनराड संगमा यांच्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि काँग्रेसवर टीका केली. एएनआयसोबत बोलताना ते म्हणाले, लोकांना आधी असे वाटत होते की, नॉर्थ-इस्ट राज्यांमध्ये केवळ काँग्रेसच राज्य करू शकते. पण भाजपने हे बदलून इतिहास रचला आहे. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह हे देखिल उपस्थित होते.      
संगमा यांनी सोमवारी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेतली होती आणि 60 सदस्यीय विधानसभेत 34 आमदारांच्या समर्थनार्थ सत्ता स्थापनेचा दावा केला होता. बैठकीत संगमा म्हणाले होते, आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि 34 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर केले. ज्यातील 19 आमदार एनपीपीचे, 6 युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्टचे, 4 पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे, 2 हिल स्टेट डेमोक्रेटिक पार्टीचे, 2 भाजपचे आणि एक अपक्ष आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: